भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडे यांची वर्णी?, आणखी तीन नावांची चर्चा

महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी म्हणून यादव तर सहप्रभारी बैष्णव यांची नियुक्ती
BJP news – देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्याच बरोबर भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपत घेतली आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त होणार आहे. कारण भाजपात एकाच व्यक्तीकडे दोन पदे राहत नाहीत. यामुळे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले महाराष्ट्रातील विनोद तावडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.
तसेच याचबरोबर आणखी तीन नावांची देखील अध्यक्षपदासाठी चर्चिली जात आहेत. यामध्ये ओम माथूर, सुनील बन्सल, के. लक्ष्मण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यासोबतच महाराष्ट्राचे भाजप नेते विनोद तावडे यांचीही राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय होते. सध्ये ते बिहारचे प्रभारी आहेत. आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. तसेच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देखील विनोद तावडे याना केंद्रात मोठी जबाबदारी मिळेल असे म्हटले आहे. RSS याबाबत निर्णय गेली असे म्हटले जात आहे.