कन्नड अभिनेता दर्शन याला हत्या प्रकरणात अटक

कन्नड अभिनेता दर्शन याला हत्या प्रकरणात अटक
DARSHAN – कन्नड सिनेसृष्टीतील आधाडीचा अभिनेता दर्शन याला बंगळूरू पोलिसांनी एका हत्या प्रकरणात अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध शहरातल्या कामाक्षीपाल्या पोलीस स्टेशनमध्ये 9 जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. म्हैसुरुमधील फार्म हाऊसमधून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रत्यक्ष यामागे तो आहे किंवा नाही याचा तपस पोलीस करत आहेत.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरु पोलिसांना कामाक्षीपाल्यामधील एका नाल्याजवळ रेणुकास्वामी या व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. 8 जून रोजी त्याची हत्या करण्यात आली होती. एका फार्मसी कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्वामी याने अभिनेता दर्शन याच्या जवळच्या अभिनेत्रीला सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते.
दरम्यान भटके कुत्रे नाल्यातून मृतदेह ओढत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळल्यानंतर स्थानिकांनी पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शनला अटक करण्यात आली आहे. अंतिम चुक्सीनंतर काय ते स्पष्ट होणार आहे.