मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घेतले औषधोपचार
JALANA – मनोज जरांगे यांनी घेतले औषधोपचार८ जून रोजी मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज बुधवारी पाचवा दिवस आहे. त्यापूर्वी चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालवली होती. त्यामुळे त्यांनी औषधोपचार घ्यावे, यासाठी दोन वेळा डॉक्टरांचे पठिकाने विनंती केली होती. तसेच गावकर्यांनी देखील विनंती केली होती. परंतु त्यांनी औषध उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर बुधवारी मध्यरात्री त्यांनी औषध उपचार घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान जरांगे पाटील यांनी सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करण्यासाठी उपोषण सुरु केले आहे. चार दिवस त्यांनी अन्न पाणी आणि औषधोपचार घेतले नव्हते. परंतु काल रात्री यांच्यावर वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून औषध उपचाराला सुरुवात करण्यात आली आहे. सलग उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने त्यांना औषध उपचाराची गरज होती. यावेळी अनेक नागरिकांनी आणि डॉक्टरांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी औषध उपचार घेण्यास सुरुवात केली आहे
अनेक आमदार, खासदार यांनी आंदोलनस्थळी भेटी दिल्या मात्र, सरकारकडून त्यांच्याकडे अद्याप कोणीही आलेले नाही. त्यामुळे मराठा समाजात नाराजी वाढत आहे. तसेच जरांगे पाटील यांनी समाजाने शांततेत सर्व कार्य करावे असा संदेश दिला आहे. त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी सर्व जातीधर्मातील लोकांनी प्रार्थना केली जात आहे.