pm surya ghar yojana : पीएम सूर्य घर योजनेसाठी मिळणार सबसिडी आणि मोफत वीज; आजच करा अर्ज …

pm surya ghar yojana : पीएम सूर्य घर योजनेसाठी मिळणार सबसिडी आणि मोफत वीज; आजच करा अर्ज …
pm surya ghar yojana : तप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी सुरु केलेल्या पीएम सूर्य घर योजनेला (pm surya ghar yojana) देशात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या योजनेची अंमलबजावणी आता होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे विजेचे संकट काहीसे दूर होईल. या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवल्यानंतर सरकार यासाठी सबसिडी देखील देते. त्यामुळे देशातील अनेक नागरीकांनी याचा लाभ घेण्यास सुरवात केली आहे.
पीएम सूर्य घर योजना 75,000 कोटी रुपयांची आहे. 1 कोटी घरांना प्रत्येकी 300 युनिट मोफत वीज पुरविण्याचे उद्दिष्ट या योजनेचे आहे. या योजनेतंर्गत नागरिकांना त्यांच्या छतावर सोलर पॅनल लावता येणार आहेत. म्हणजेच सूर्याच्या ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात येईल. लाभधारक ग्राहकांना या योजनेतंर्गत 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. अधिक वीज निर्मिती झाली तर त्याच्या माध्यमातून काही प्रमाणात कमाई देखील करता येणार आहे. या योजनेसाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर online पद्धतीने अर्ज करता येणार आहे. देशातील कोणत्याही नागरिकास यासाठी अर्ज करता येणार आहे.
सरकार अशी देणार सबसिडी
या योजनेतंर्गत ग्राहकांनी एक किलोवॅट (1 KW) सोलर पॅनल आपल्या छतावर बसवल्यानंतर सरकार 18,000 रुपये सबसिडी देते. तर 2 किलोवॅटच्या पॅनलवर 30 हजार रुपये सबसिडी मिळते. तर 3 किलोवॅटचे पॅनल लावल्यास सरकार 78 हजार रुपयांची सबसिडी मिळते.