लोकसभेचे अधिवेशन २४ जूनपासून सुरु होणार

लोकसभेचे अधिवेशन २४ जूनपासून सुरु होणार
दिल्ली – नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली असून नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला आहे. आता १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून रोजीपासून सुरू होणार आहे. यामध्ये नवनिर्वाचित सदस्य संसदेत शपथ घेतील आणि लोकसभा सभापतींची निवड होईल. अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील आणि पुढील ५ वर्षांसाठी सरकारची रुपरेषा स्पष्ट करणार आहेत. सोशल मीडियाद्वारे मंत्री किरेन रिजिजू यांनी हि माहिती दिली आहे. ते म्हणाले कि,१८ व्या लोकसभेचे पहिले सत्र २४ जून ते २३ जुलै पर्यंत चालणार आहे. यामध्ये देशातील नवनिर्वाचित सदस्यांची शपथ, अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि त्यावर चर्चेसाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे.