उपेंद्र द्विवेदी यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती

उपेंद्र द्विवेदी यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती
दिल्ली – लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून पुढील पदभार स्वीकारणार आहेत. मंगळवारी 11 जून रोजी केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे, जनरल मनोज पांडे हे रिटायर्ड होणार असून त्यांच्या जागी नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना चीन आणि पाकिस्तानलगतच्या सीमांवर काम करण्याचा चांगला अनुभव आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून काम करत आहेत. द्विवेदींना सेवाजेष्ठतेनुसार या पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी विविध पदांवर काम केले आहे. त्यांचा अनुभव चांगला आहे. त्यामुळे ते भारताचे नवीन लष्करप्रमुख म्हणून चांगल्याप्रकारे काम करतील.
जनरल मनोज पांडे 30 जूनला निवृत्त होत आहेत. गेल्या महिन्यात जनरल मनोज पांडेंचा कार्यकाळ एका महिन्यासाठी वाढवला होता. ते 31 मे ला रिटायर होणार होते आणि त्याच्या सहा दिवस आधी त्यांचा कार्यकाळ वाढवला गेला होता. मात्र आता उपेंद्र द्विवेदी हे पदभार स्वीकारणार आहेत. त्यांचे या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.