राज्यात मान्सून बरसणार… या विभागांना हवामान विभागाचा अलर्ट !

राज्यात मान्सून बरसणार... या विभागांना हवामान विभागाचा अलर्ट !
mansoon rain – अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी मान्सूनची आतुरतेने बात पाहत होते, गेल्या ५ ते ६ दिवसापासून राज्याच्या विविध भागात मान्सूनने जोरदार आगमन केले असून पुणे, धाराशिव, आणि इतर ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने कोकण आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्हे व्यापले आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भात देखील धडक दिली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्यात देखील बऱ्यापैकी पाऊस पडला आहे.
अहमदनगर जिल्यातील पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीगोंदा, श्रीरामपुर, जामखेड, संगमनेर, कोपरगाव आदी ठिकाणी पावसाचे आगमन झालेले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे सुरु केली आहेत. कपाशी लागवडीस सुरुवात झाली आहे. तर कुठे पेरणीसाठी सुरुवात झाली आहे.
मान्सूनचे मंगळवारी पश्चिम विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र दुसरीकडे पूर्व विदर्भात अद्यापही मान्सूनचे आगमन झाले नाही, बाष्पयुक्त हवेमुळे पुन्हा एकदा पूर्व विदर्भात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून वादळाचा इशारा देखील देण्यात आला आहे, महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी राहू शकतो असे देखील हवामान विभागने म्हटले आहे.