श्रीरामपुरात मुख्याध्यापिकेस ४५ हजारांची लाच घेताना पकडले

श्रीरामपुरात मुख्याध्यापिकेस ४५ हजारांची लाच घेताना पकडले
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपुर येथे मुख्याध्यापिकेला ४५ हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाने सापळा लावून मुख्याध्यापिकेस लाच घेताना रंगेहात पकडले असून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास अधिकारी करत आहेत.
दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांची फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी मुख्याध्यापिकेने मोबदला मागितला होता. नगर लाचलुचपत विभागाने श्रीरामपूरमध्ये ही कारवाई केली आहे. वेतनश्रेणीच्या फरकाच्या १ लाख ६३ हजारांसाठी मागितली होती. ४५ हजारांची लाच स्विकारताना मुख्याध्यापिकेस लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. संगिता नंदलाल पवार असे लाचखोर मुख्याध्यापिकेचे नाव आहे. या प्रकारे लाचखोरीच्या प्रकार अलीकडल्याकाळात वाढताना दिसत आहे. याला आला घालण्याची मागणी केली जात आहे.