मंत्री देसाई घेणार जरांगे यांची भेट ; मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता
जालना – “सरकारने चर्चा केल्यानंतर समाजासोबत बोलून आंदोलनाची दिशा ठरवू. सरकारच म्हणण काय आहे, हे आज कळेल” कारण मंत्री शंभूराजे देसाई आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे मराठा नेते आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी अंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेणार आहेत. त्यातील चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. आज सायंकाळी याबाबतचा निर्णय होणार आहे.
सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करावे यासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांची आज दि. १३ जून रोजी शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई भेट घेणार आहेत, तसेच त्यांच्या सोबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे असण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई, तानाजी सावंत दुपारी साडे बारा वाजता जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी सरकारमधील मंत्री पहिल्यांदा जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याने सरकार पातळीवरील आज जरांगे पाटील यांच्यासोबत पहिल्यांदा चर्चा होणार आहे, त्यात काय चर्चा होते हे पाहावे लागेल.
दरम्यान मंत्री शंभूराजे देसाई हे मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यांच्यासह आमदार राजेंद्र राऊत, खासदार संदीपान भुमरे हेदेखील जरांगेंच्या भेटीला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अंतरवाली सराटीचे दौरे वाढले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज अंतरवाली सराटीला जाणार आहेत. जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, ऊबाठाचे धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी यापूर्वीच जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. खा, सोनावणे यांनी राज्यपाल याना पात्र लिहून आंदोलनाची दखल घायवी अशी विनंती केली आहे. अन्यथा राज्यात परिस्थिती बिकट होईल असे देखील त्यांनी पात्रात म्हटले आहे.