मंत्री “तटकरे”च्या उपस्थितीत महिला आयोगाची बैठक संपन्न

मंत्री "तटकरे"च्या उपस्थितीत महिला आयोगाची बैठक संपन्न
Mumbai – राज्यातील महिलांसाठी महिला व बालविकास मंत्रालय विभाग यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यावर चर्चा करून जिल्हापातळीवर त्या राबवण्यासाठी राज्य महिला आयोगाची बैठक महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या दालनात पार पडली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
दरम्यान राज्य महिला आयोगाकडून जिल्हास्तरावर घेण्यात येणारी महिला आयोग आपली दारी जनसुनावणी, विधवा प्रथा बंदी साठी ग्रामसभामधील ठराव, सायबर सुरक्षेसाठी मेटा सोबत सुरू असलेला मिशन ई सुरक्षा उपक्रम आदी बाबत महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांच्याशी चर्चा करून त्या सोडवण्यासाठी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य महिला योगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच आषाढी वारीला सुरुवात होत असून या वारीत पायी चालणाऱ्या लाखो महिला वारकऱ्यांसाठी राज्य महिला आयोग गेली दोन वर्ष राबवत असलेल्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विठ्ठलाच्या ओढीने शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या लाखो महिला वारकऱ्यांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी आयोग करत असलेल्या कामाची माहिती देत प्रशासनाकडून अपेक्षित कामाविषयी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे आणि सबंधित अधिकारी उपस्थित होते.