NEET २०२४ : या विद्यार्थ्यांची होणार पुन्हा परीक्षा; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरु होणार
NEET UG 2024 मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1 हजार 563 मुलांचे निकाल रद्द केले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान दिली आहे. तसेच, निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिकांच्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे कि, ग्रेस गुण मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. मात्र समुपदेशनावर बंदीघातली जाणार नाही. NEET परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या उमेदवारांची पुनर्परीक्षा 23 जून रोजी पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे एनटीएने म्हटले आहे.
यामध्ये NTA ने या विध्यार्त्यांसाठी दोन पर्याय ठेवले असून एकतर पुन्हा परीक्षा द्यावी किंवा ग्रेस मार्क कट करून पुढील प्रक्रिया केली जाईल. तसेच 23 जून रोजी पुन्हा परीक्षा आणि त्याचा निकाल 30 जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे.