सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड
मुंबई – लोकसभा निवडणुकीत खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव पत्करल्यानंतर उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर बारामतीच्या काटेवाडीत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यांच्या विरोधात एकही उमेदवार दिला नसल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते, मात्र महायुतीच्या उमेदवारांची यावेळी दांडी मारली. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार हे जवळपास आधीच निश्चित झाले होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुनील तटकरे, खा. प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते. मात्र यावेळी छगन भुजबळ राज्यसभेसाठी आग्रही होते मात्र पवार याना उमेदवारी दिल्याने ते काहीसे नाराज झालेले पाहायला मिळाले