शिष्यवृत्ती योजनेत बदल ; अनेक विद्यार्थ्यांना बसणार फटका

शिष्यवृत्ती योजनेत बदल ; अनेक विद्यार्थ्यांना बसणार फटका
राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेणयात यावे यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शासकीय शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली होती मात्र, आता महाराष्ट्र सरकारकडून यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलविरोधात विद्यार्थी आणि विरोधी पक्ष यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे अनेकांचे नुकसान होणार आहे.
परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये SC, ST, OBC आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता येते, मात्र शिष्यवृत्तीसाठी घालून दिलेल्या नवीन अटी ‘अवाजवी’ असल्याची टीका सध्या होत आहे.
राज्यातील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर किमान 75 टक्के मार्क्स या सरकारी शिष्यवृत्तीसाठी हवे असणार आहे. तसेच परदेशातील संपूर्ण शिक्षणासाठी 30 ते 40 लाख रुपयापर्यंतच मर्यादा घालण्यात आली आहे. त्याचबरोबर आता कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. शिष्यवृत्ती मिळेल यामुले अनेकांनी परदेशात ऍडमिशन घेतले, मात्र आता त्यांना कमी मार्क असल्याने त्यांना शिष्यवृत्तीपासून दूर राहावे लागणार आहे.
तसेच शासनाकडून सर्वाना सामान न्याय या हेतूने आता या शिष्यवृत्ती यहोजनेमध्ये बदल करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. तसेच सर्व विघ्गांमध्ये गोंधळ उडत असल्याने यामध्ये आता सुसूत्रता येणार आहे.
