पुण्यात गुंड गजानन मारणेकडून खासदार निलेश लंके यांचा सत्कार

पुण्यात गुंड गजानन मारणेकडून खासदार निलेश लंके यांचा सत्कार
अहमदनगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके हे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. लंके यांनी पुण्यतील गुंड गजा उर्फ गजानन मारणे यांची भेट घेतली आहे. या कृतीमुळे अहमदनगरसह राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विरोधकांना आयती संधीच लंके यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच खासदार झालेल्या निलेश लंके यांनी गजा मारणे याची भेट घेऊन सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे राज्यात आता राजकीय वाद रंगणार आहे. राजकाणातील गुन्हेगारीकरण यामुळे समोर आले आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारले होते, असे अजिबात घडता काम नये, खडेबोल सुनावले होते.
गजानन मारणे हा मूळचा मुळशी तालुक्यातीळ आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे. त्यांच्यात शीत वॉर सुरु असते.
निलेश लंके यांची हि कृती त्यांना मारक ठरणार असेच दिसतेय कारण राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ उठण्याची शक्यता आहे. शरद पवार याना याविषयी आता खुलासा करावा लागेल अन्यथा त्याच्यावर टीकेची झोड उठणार यात शंकाच नाही. लंके यांनी विरोधकांना यामुळे आयते कोलीतच दिले आहे.
अमोल मिटकरी यांची लंकेवर टीका
“हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता”, असे म्हणत अजित पवार गटाचे आमदार अमोल नित्करी यांनी शेर-शायरीतून खा. निलेश लंके यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी शरद पवार गटावर निशाणा साधला आहे. तुतारी गटाचे शालीन वक्ते आता कुठे लपले आहे असे मिटकरी यांनी म्हटले आहे. पार्थ पवारांनी गजा मारणेची भेट घेतली होती तेव्हा गदारोळ माजवला होता. आजित पवारांनी चूक झाल्याचं त्यावेळी मान्य केले होते. आता यावर शरद पवार काय भूमिका घेणार ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.