शिखर बँक घोटाळा : अजित पवारच्या अडचणीत वाढ, अण्णा हजारे पुन्हा पिटिशन दाखल करणार

शिखर बँक घोटाळा : अजित पवारच्या अडचणीत वाढ, अण्णा हजारे पुन्हा पिटिशन दाखल करणार
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली. मात्र आता क्लीनचिट दिलेल्या क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव, शालिनीताई पाटील, किसन कवाद आता नवी प्रोटेस्ट पीटिशन दाखल करणार आहेत. मात्र, ही प्रोटेस्ट पीटिशन कोर्ट ग्राह्य धरणार का? यावर २९ जून रोजी युक्तिवाद होणार आहे. तर ईडीची भूमिका संशयास्पद असल्याचा अण्णा हजारे यांच्या वकिलांचा दावा आहे.
शिखर बँक घोटाळा प्रकरणात कोणतीही अनियमितता नाही. तपासयंत्रणेनं जानेवारीत सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील जाहीर केला आहे. अजित पवार,सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य आरोपींना क्लीन चीट दिली आहे. कर्ज वाटप, सारख कारखाने विक्री यामुळे बँकेला कोणतही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत, असा रिपोर्ट मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही महिन्यांपूर्वी दिला होता.
बँकेच्या कामकाजाची नाबार्डने २००७ ते २०११ दरम्यान तपासणी केली होती. त्यानंतर बँकेन उपलब्ध केलेल्या अहवालातील तपशीलाच्या पार्श्वभूमीवर जानेवारी २०१३ मध्ये बँकेच्या कामकाजाची चौकशी सुरू करण्यात आली. जानेवारी २०१४ मध्ये सहकार आयुक्तांना सादर केलेल्या चौकशी अहवालात बँकेचे नुकसान झाले असल्याचे म्हटले नाही.