सरकारने ५४ औषधांच्या किमती केल्या कमी

सर्कारकरने ५४ औषधांच्या किमती केल्या कमी
दिल्ली – सरकारने अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आत देशातील रुग्णांचा विचार करून महाग असणारे औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 54 गरजेच्या औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. ज्या औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये मधुमेह, हृदय रोग आणि कानाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टीव्हिटामिन्सचा समावेश आहे. त्यामुळे देशातील सुमारे १० कोटी लोकांना याचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी म्हणजेच एनपीपीएची १२४ वी बैठक पार पडली. या बैठकीत औषधांच्या किमती कमी करण्यासाठीचा हा मत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला. एनपीपीए देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमती ठरवते असते. या औषधांचा वापर देशातील सामन्य नागरिक करतात.
तसेच बैठकीत एकूण 54 औषधी फॉर्म्युलेशन आणि 8 विशेष औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गेल्या महिन्यात वापरल्या जाणाऱ्या 41 औषधांच्या आणि 6 विशेष औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या.
