शिखर बँक घोटाळा : या प्रकरणाशी माझा संबंध नाही : अण्णा हजारे

शिखर बँक घोटाळा : या प्रकरणाशी माझा संबंध नाही : अण्णा हजारे
अहमदनगर – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि इतर काहीजण याना पोलिसांच्या आर्थिक शाखेने लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान क्लीनचित देण्यात आली होती. मात्र काल दि. १४ जून रोजी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे क्लोजर रिपोर्टला कोर्टात आव्हान देणार आहेत अशा बातम्या सर्वत्र प्रसारित झाल्या आणि राजकीय टीका टिपण्णी देखील झाल्या होत्या. मात्र आता आपण असे काही करणार नसून या बातम्या आल्याने आपल्याला धक्काच बसला. या प्रकरणात माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करून काही लोक स्वार्थ साधत आहेत, अशाप्रकारे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान सुमारे २५ हजार कोटी रुपये शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लीन चिट देण्यात आल्याच्या मुद्द्यावर मी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मी कोर्टात जाईल असे कुठेही बोललो नाही. तरीही माझ्या नावाने प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. माझे नाव आल्याचे ऐकून मला धक्का बसला आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
तसेच 15 वर्षापूर्वी मी या प्रकरणात आवाज उठवला होता. मात्र, आता यात माझा कुठलाही संबंध नाही, असं सांगतानाच अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीट संदर्भात ज्यांना माहिती आहे ते बोलतील. माझा कुठलाही संबंध नाही, असे देखील अण्णा यांनी म्हटले आहे.