MHT-CET RESULT : ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल आज लागणार

MHT-CET RESULT : ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल आज लागणार
MHT-CET RESULT 2024 – महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (MHT CET) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र चे निकाल आज, दि.१६ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता cetcell.mahacet या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहेत. MHT CET २०२४ चा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असेल. परीक्षेसाठी तब्बल सात लाख २५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
MHT CET २०२४ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणांवर आधारित राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. अनेक दिवसांपासून १२ वीचे विद्यार्थी या परीक्षेचा निकालाची वाट पाहत होते. आज निकाल लागणार असून पालकांसह विद्यार्थी देखील गुणांनुसार कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा हे ठरवणार आहेत. त्यांच्यासाठी हा निकाल म्हणजे टर्निंगपॉईंट ठरणार आहे.
परीक्षेचा निकाल असा करा चेक
१) MHT CET च्या अधिकृत साइट cetcell.mahacet.org वर जा.
२) होमपेजवर, सक्रिय झाल्यावर ‘MHT CET २०२४ निकाल’ लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
३) निकालात प्रवेश करण्यासाठी आवश्यकतेनुसार अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
४) MHT CET २०२४ चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
५) त्यानंतर उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड (निकाल) तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
तसेच MHT CET २०२४ च्या निकालामध्ये उमेदवाराचे गुण, प्रत्येक विषयानुसार गुण, रँक आणि परीक्षेतील टक्केवारी यासारख्या तपशीलांचा उल्लेख केलेला असणार आहे. परीक्षा बोर्ड एमएचटी सीईटी निकालासह महाराष्ट्र सीईटी टॉपर यादी देखील प्रसिद्ध करणार आहे.
