मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडणार : खा. लंके

मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडणार : खा. लंके
अहमदनगर – मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करणार असून जरांगे फॅक्टरचा प्रभाव अहमदनगर लोकसभा मतदार संघात देखील दिसून आला. त्यामुळेच विजयाचा मार्ग सुकर झाला. मराठा लक्षणाचा मुद्दा नक्कीच लोकसभेत मांडणार’, असे आश्वासन दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील याना दिले.
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांची खासदार लंके यांनी छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. खा.लंके म्हणाले कि, जरांगे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण समाजासाठी केले आहे. त्याच्या या उपोषणाचा माझ्या मतदारसंघातदेखील मला फायदा झाला. ट्युलेच आपण विजयी झालो आहोत. भविष्यातही मराठा आंदोलनासाठी आपले सहकार्य असेल असे त्यांनी आश्वासन जरांगे याना दिले आहे.