GOOD NEWS : विद्यार्थ्यांना एसटी पास आता थेट शाळेत मिळणार

विद्यार्थ्यांना एसटी पास आता थेट शाळेत मिळणार
मुंबई – राज्यातील शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता थेट त्यांच्या शाळेत किंवा महाविद्यालयात पास मिळणार आहे. १८ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तशाप्रकारच्या सूचनाच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी स्थानिक एसटी प्रशासनाकडून केली जाणार आहे. मात्र यासाठी संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाला तसे पत्र द्यावे लागणार आहे.
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय रांगेत उभे राहून पास घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. तसेच एसटीचे आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. दि. १५ जून पासून आता सुरु झाल्या आहेत. सरकारने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून पाससाठी 66% इतकी सवलत दिली आहे. तर सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. ते आता सर्वांसाठी सोईचे होणार आहे.