जॉब २०२४ : “राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स”मध्ये भरती सुरू, आजच करा अर्ज…

जॉब २०२४ "राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स"मध्ये भरती सुरू, आजच करा अर्ज…
Recruitment २०२४ : केंद्र सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून सुमारे १५८ ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ आणि अधिकारी यांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरती प्रक्रिया ८ जून २०२४ पासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार याना या पदांसाठी १ जुलै २०२४ पूर्वी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
दरम्यान अर्ज भरणाऱ्या ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना १००० रुपये अर्ज फी असणार आहे. तर इतर कॅटेगरीतील पुरुष आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवार इंटरनेट बँकिंग खाते किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याचा पर्याय निवडू शकतात. तसेच यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २७ वर्षे असावे. तर http://www.rcfltd.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भारत आणि अधिक महती पाहता येणार आहे.
रिक्त पदे आणि पदसंख्या
१. मॅनेजमेंट ट्रेनी (रासायनिक) – ५१
२. मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल ) – ३०
३. मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – २७
४. मॅनेजमेंट ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन) – १८
५. मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) – ४
६. मॅनेजमेंट ट्रेनी (फायर) – २
७. मॅनेजमेंट ट्रेनी (सीसी लॅब) – १
८. मॅनेजमेंट ट्रेनी (औद्योगिक अभियांत्रिकी) – ३
९. मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग ) – १०
१०. मॅनेजमेंट ट्रेनी (ह्युमन रिसोर्सेस) – ५
११. मॅनेजमेंट ट्रेनी (Administration ) – ४
१२. मॅनेजमेंट ट्रेनी (कॉर्पोरेट कॅम्युनिकेशन) – ३