Pankaja Munde : ‘अन्यथा मी राजकारण सोडून देईल’ पंकजा मुंडे

Pankaja Munde : 'अन्यथा मी राजकारण सोडून देईल' पंकजा मुंडे यांचं समर्थकांना भावनिक आवाहन
बीड – लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने कार्यकर्ते आत्महत्या करत आहेत. त्यामुळे मुंडे यांनी आता आत्महत्या नका करू १०० दिवसात चित्र बदललेले असेल. अशाप्रकारे घटना घडत असतील तर मी खंबीर कशी राहू… तुम्ही खंबीर राहा.. अन्यथा राजकारण सोडावे लागेल असे, पंकजा मुंडे यांनी स्व. पोपट वायभासे यांच्या कुटुंबीयांची भेटीनंतर म्हटले आहे. वैभासे कुटुंबियांचे अश्रू पाहून मुंडे याना देखील रडू आवरता आले नाही. यावेळी यांनी मुलांची आपण जबाबदारी घेत असल्याचे सांगितले.
दरम्यान मुंडे म्हणाल्या कि, माझा कार्यकर्ता स्व.पोपट वायभासे यांच्या कुटुंबियांची आज आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथे सांत्वनपर भेट घेतली. पोपटराव प्रत्येक कार्यात स्वतःला झोकून देणारा सक्रिय कार्यकर्ता…खरतर लढाऊ वृतीचा, पण असा टोकाचा निर्णय घेऊन कुटुंबाला सोडून जाण मला कमकुवत करणार आहे.
तसेच आज पोपटराव वायभासे यांच्या कुटुंबावर कधीही न हलक होणार डोंगराएवढ दुःख कोसळल आहे, त्यांच्या दुःखाचा भार वाटून घेण्याचा माझा सतत प्रयत्न राहील. त्यांच्या निरागस मुलांची आणि कुटुंबियांची सर्व जबाबदारी देखील मी घेते आहे. परंतु ही जवाबदारी माझ्यासाठी वेदनादायी आहे. त्यांच्या मुलांच्या डोळ्यातील अस्थिर भाव मला अस्वस्थ करणारे आहेत.
मला माझी लोक गमवायची नाहीत : मुंडे
माझी सर्वांना विनंती आहे “एका पराभवाने नैराश्य येईल एवढे आपण निश्चित कमकुवत नाहीत, परंतु या वेदना मला असह्य आहेत. स्वतःचा जीव देवू नका. तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवाय तर मला सुध्दा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवाय. मला माझी लोकं गमवायचे नाहीत. पराभवाने मी खचणारी नाही पण अशा घटना मला हादरून टाकतात. मी आज खूप अस्वस्थ आहे, असे मुंडे यांनी म्हटले आहे.