Government Employee : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे होणार…

Government Employee : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे होणार…
Government Employee : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्त्यात वाढ करण्यात यावी, ३ लाख रिक्त पद भरावीत या व इतर मागण्यांसंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी या मागण्यांचा सकारात्मकरित्या विचार करून प्रश्न सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी याना याचा मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे.
दरम्यान, विधानसभेत घोषणा केल्यानुसार सुधारित निवृत्ती योजनेबाबतचीअधिसूचना काढण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रामुख्याने करण्यात आली. केंद्र आणि इतर २५ राज्यांप्रमाने महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तिचे वय ६० वर्षं करावे, ही मागणी सातत्याने केली जात आहे, आत हि मागणी मार्गी लागेल असे चित्र आहे.
तसेच केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून वाढवून ५० टक्के केला आहे. त्याविषयीचा प्रस्तावही राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी तयार केला असून, तो राज्य शासनाने मंजूर करावा, अशी मागणीही महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या दोन्ही मण्यांसंदर्भात शिंदे यांनी सकारात्मकता दाखवली आहे .
यावेळी सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात अधिसूचना काढावी तसंच सरकारी नोक-यांची ३ लाख रिक्त पदं भरावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
