मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार!

मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार!
MUMBAI – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याचे म्हटले जात आहे. लोकसभा निवडणूक संपली असून राज्यातील तीनही पक्षाचे आमदार मंत्रिपदासाठी गुढग्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर कभी ख़ुशी कभी गम होण्याची भीती सध्या नेत्यांत आहे. त्यामुळे खरोखरच विस्तार होणार कि, अनेकांना गाजराचा दाखवले जाणार हे येणार काळच ठरविलं.
नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात काही आमदारांची संभाव्य मंत्री म्हणून नावे चर्चेत आहेत. यामध्ये भाजपकडून प्रविण दरेकर, प्रसाद लाड, जयकुमार रावल, संजय कुटे, गणेश नाईक, आशिष शेलार, राहुल कुल यांचं नाव चर्चेत आहे. शिवसेनेकडून संजय शिरसाठ, भरत गोगावले, बालाजी किणीकर, प्रताप सरनाईक, योगेश कदम यांची नावं चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अमोल मिटकरी, मकरंद पाटील, रामराजे नाईक निंबाळकर याची नाव चर्चेत आहेत. तर काही मंत्र्यांचे खांदेपालट केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खाते काढून दुसऱ्या कोणाला देणार आहेत.
दरम्यान पावसाळी अधिवेशनाआधीच मंत्री मंडळ विस्ताराचा बार उडवून दिला जाईल. कारण निवडणुका लागायला काही महिने उरले असताना का होईना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिपद फायद्याचे ठरेल. चांगले काम केल्यास पुन्हा सत्तेत आल्यास आपल्या नावाचा विचार होईल, अशी भावना इच्छुक आमदारांची आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आता कोणावर विश्वास टाकतात ते पाहावे लागणार आहे.