राहुरी : रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या

राहुरी : रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या
राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील टाकळीमिया रेल्वेस्टेशनवर मुसळवाडी येथील आसिफ आयुब पठाण वय (३०) या तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, टाकळिमियाँ रेल्वेस्टेशन परिसरातील लोकांनी टाकळीमियाचे पोलीस पाटील नामदेव जगधने यांना सादर घटनेची माहिती दिली. त्यानंतर जगधने यांनी घटनेची महिती पोलीस स्टेशनला लगेच दिली. सदर घटनेचे गाम्भीर्य लक्षात घेऊन पोलीस हवालदार राहुल यादव यांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी करून मयत पठाण याच्या कुटुंबियांशी संपर्क केला.
दरम्यान मयताचा भाऊ अनिस आयुब पठाण हा घटनास्थळी आल्यावर त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने आजारपणाला कंटाळुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला. पोलीसांनी सदर घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरीच्या ग्रामिण रूग्णालयात पाठवला आहे. पोलीसांनी आकस्मिक मृत्यृची नोंद केली असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत. अशा घटना घडत असल्याने परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली.