राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरूवात

राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरूवात
राज्यात आजपासून 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे. राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रांवर भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. 17 हजार 471 पदांसाठी राज्यभरातून 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्चशिक्षित तरूणांची संख्याही जास्त आहे.
अहमदनगर जाळ्यात देखील पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणावर उमेदवार आले आहेत. हि भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असे आवाहन पोलीस अधिक्षकांनी केले आहे.