LIC विकणार आपली संपत्ती…

LIC विकणार आपली संपत्ती...
LIC NEWS – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन बिमा निगम (LIC) हि शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असुन LIC ने आता आपली संपत्ती विकण्याचा निर्णय घेतला आहे. एलआयसी मेट्रो शहरातील आपली संपत्ती विकून 50 ते 60 हजार कोटी रुपये जमवणार आहे. त्यासाठी एलआयसी आपले प्लॉट आणि व्यावसायिक प्रॉपर्टी विकणार आहे. एलआयसीचे अनेक शहरांमध्ये प्राइम लोकेशनवर प्लॉट अन् कमर्शियल बिल्डींग आहेत. त्या विकून कंपनी आपल्या प्रॉफीटमध्ये वाढ करणार आहे.
माहितीनुसार कंपनी मूल्यांकनासंदर्भात सध्या आढावा घेत आहे. आता एलआयसी कंपनीच्या इमारतींचे नवीन मूल्यांकन करण्याचा विचार करत आहे. सध्याच्या मूल्यांकनानुसार, एलआयसीची रिअल इस्टेट मालमत्ता सुमारे 50,000 ते 60,000 कोटी रुपयांची होती. परंतु व्यावसायिक किमत त्याच्या पाच पट असू शकते. एलआयसीकडे सद्य स्थितीत 51 लाख कोटींची संपत्ती आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये एलआयसीचा नफा 40,676 कोटी रुपये तर मागील वर्षी हाच नफा 36,397 कोटी रुपये होता.
LIC आली संपत्ती विक्रीनंतर नवीन मालकाला त्या जागेचा पुनर्विकास करणे, नवीन पद्धतीने इमारती उभारणे अशी कामे करता येतील. त्यामुळे कंपनीच्या प्रॉफीटमध्ये वाढ होणार आहे. या प्रक्रियेसाठी LIC नवीन कंपनी बनवनार असल्याचे देखील समजतेय. याचा फायदा कंपनी आणि तिच्या ग्राहकांना देखील होणार आहे. तसेच कंपनी लिस्टेड असल्याने गुंतवणूक देखील वाढू शकते.