खरीप-२०२४ : “एक” रुपयात पीक विमा भरण्यास आजपासून सुरुवात

खरीप-२०२४ : "एक" रुपयात पीक विमा भरण्यास आजपासून सुरुवात
मुंबई – पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी ‘एक रुपयात’ विमा भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा घरून घ्यावा असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आवाहन केले आहे.
दरम्यान भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या http://pmfby.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून सिएससी केंद्रांमधून केवळ एक रुपया विमा हिस्सा भरून आपला विमा भरता येणार आहे.
तसेच सर्व शेतकरी बांधवांना मुंडे यांनी आवाहन केले आहे की, मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी विक्रमी संख्येने 15 जुलैच्या आत आपला पीकविमा भरून आपले पीक संरक्षित करुन घ्यावे, तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता.