केंद्रीय निवडणून आयोगाकडून महाराष्ट्रासह तीन राज्यात निवडणुकीसाठी तयारी सुरु

केंद्रीय निवडणून आयोगाकडून महाराष्ट्रासह तीन राज्यात निवडणुकीसाठी तयारी सुरु
Election Commission – देशातील लोकसभा निवडणुकीनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेसाठी अधिसूचना काढण्यात आली असून महाराष्ट्र राज्यासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग कामाला लागले आहे. यासाठी आज मतदारांच्या याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने सर्व सामान्य नागरीकांना आवाहन केले आणि कि, जर कोणी अद्यापपर्यंत मतदार नोंदणी केली नसेल तर त्यांनी त्वरितमतदार नोंदणी करुन घ्यावी. तसेच घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करा, अशा सुचना देखील आयोगाने दिल्या संबंधितांना दिल्या आहेत. दरम्यान २५ जूनपासून महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर या ठिकाणी निवडणुकीच्या आधीची तयारी सुरु होणार आहे. पोलींग स्टेशन्स, मतदारांचे समूह यांची चाचपणी केली जाणार आहे. असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. त्यादृष्टीने आता राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांनी देखील कमला सुरुवात आधीपासूनच सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या राज्यात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे असेच समजून राजकीय वातावरण गरम होणार आहे.