खा. निलेश लंके यांनी घेतली ठाकरे यांची भेट !

खा. निलेश लंके यांनी घेतली ठाकरे यांची भेट !
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदारकीची शपथ घेण्यासाठी दि.२३ जून रोजी दिल्लीला रवाना होत आहे. तत्पूर्वी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. आणि सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांना वंदन केले. तसेच जिल्ह्यातील महायुतीच्या १२ पूर्ण जागा निवडून आणू असे निलेश लंके यांनी ठाकरे यांच्या भेटीदरम्यान म्हटले आहे.
दरम्यान मी लहान असताना साहेबांनी मला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता. त्या प्रसंगाची अतिशय उत्कट व भावनिक आठवण यानिमित्ताने झाली. नवा महाराष्ट्र घडविणारे दोन साहेब अर्थात बाळासाहेब आणि आदरणीय पवारसाहेब अशा महान व्यक्तीमत्वांचे मला सतत आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय आपुलकीने विचारपूस करुन विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व आमदार येणाऱ्या विधानसभेला निवडून आणणार असा शब्द उद्धवजींना दिला असल्याचे खा. निलेश लंके यांनी म्हटले आहे. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते.