JULY 2024 new rules : १ जुलैपासून नियमांत होणार बदल, पहा काय होतीस स्वस्त आणि महाग…

जुलैपासून नियमांत होणार बदल, पहा काय होतीस स्वस्त आणि महाग…
JULY 2024 NEW RULES : सध्या देशाचा आणि राज्याच्या अधिवेशन सुरु आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या सवलती तर महागाई देखील वाढलेली पाहायला मिळणार आहे. मात्र त्याअगोदर १ जुलै २०२४ (1 july new rules) पासून अनेक बदल होणार आहेत. त्यामध्ये बँक खात्यापासून तर क्रेडिट कार्ड (credit card), गॅस, मोबाईल रिचार्जेस (mobile recharge) आदींच्या नियमांत बदल होणार असून ते लागू आलेले जाणार आहेत. त्यामुळे महागाईसोबत याची देखील झालं लागणार आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलची (petrol – diesel) स्वस्ताई 29 जूनपासूनच आली आहे. गॅस सिलेंडर, क्रेडिट कार्डपर्यंत अनेक सेवांमध्ये बदल होणार आहेत. तसेच मेट्रोसिटीत तर पेटवलं डिझेल अधिक स्वस्त होणार आहे. प्रत्येक महिन्याच्य पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलेंडर आणि एटीएफच्या किंमतीत बदल करतात. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले नाही. आता निवडणुका झाल्याने 1 जुलै रोजीपासून त्यामध्ये बदल करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कमी झालेले दार पुन्हा वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.
तसेच मोबाईल क्रमांक पोर्टेबिलिटीच्या नियमात बदल होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने TRAI ने सिम फसवणूक रोखण्यासाठी नवीन नियम आणले आहेत. नवीन सिम खरेदी केल्यानंतर पुढील सात दिवस तुम्हाला ते पोर्ट करता येणार नाही. सेवा पुरवठादार कंपनी बदलता येणार नाही. दरम्यान विविध कंपन्यांनी आपले रिचार्जेस वाढवले असून मोबाईल रिचार्ज केल्यावर जास्त पैसे द्यावे लागनार आहेत. रिलायन्स, जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल कंपन्यांनी त्यांचा टेरिफ वाढवला आहे, त्यामुळे इतर कंपन्या देखील ते वाडवणार हे नक्कीच आहे.
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची आता धोक्याची घंटा असून जुलै पासून क्रेडिट कार्ड बिल पेमेंटचे नवीन नियम लागू होणार आहेत. यामध्ये सर्व बँकांचे क्रेडिट कार्ड पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम द्वारे प्रक्रिया करण्यात येतील. अर्थात बँकांनी (bank) या निर्देशांचे अद्याप पालन केलेले नाही. आतापर्यंत फक्त ८ बँकांनी BBPS वर बिल पेमेंट सक्रिय केले आहे. अनेक बँकांनी त्यांच्याकडे वापरात नसलेली खाती बंद करण्यात येणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेने यासाठी निर्णय घेतला असून हि खाती बंद करण्यात येणार आहेत.