ahmednagar politics : ढाकणे यांना उमेदवारी द्या अन्यथा राजीनामा देणार; जिल्हाध्यक्ष फाळके यांचा इशारा

ahmednagar politics : ढाकणे यांना उमेदवारी द्या अन्यथा राजीनामा देणार; जिल्हाध्यक्ष फाळके यांचा इशारा
ढाकणे यांची राजळेंवर टीका; लढण्यासाठी तयार असल्याचे संकेत
शेवगाव (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि मित्र पक्षांना नगर जिल्ह्यातील दोन्ही ठिकाणी आपले खासदार निवडून आल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यातच आता विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी आणि नेत्यांनी जोमाने कमला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी (sp) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चाना शेवगाव-पाथर्डीसह जिल्ह्यात उधाण आले आहे.
आगामी विधासनभा निवडणूकीसाठी शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाकडून अनेक दिवसांपासून अॅड. प्रताप ढाकणे यांनी आमदारकीची तयारी सुरु केली आहे. त्यातच त्यांनी लोकसभा निवडणुकीत लंके यांचा प्रचार करताना आल्याची वातावरण तयार केले होते, हे लपून राहिले नाही. त्यांनी दरम्यानच्या काळात अनेक आंदोलने केली त्यामध्ये सत्ताधारी आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळत नेहमी टीका करण्याची संधी सोडली नाही. आता श्री. ढाकणे याना या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, त्यासाठी आपण आग्रही आहोत, जर तसेच झाले नाही तर, पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला आहे.
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणी निवडीसाठी पक्षाची बैठक पार पाडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशचे सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, शेवगाव तालुकाध्यक्ष हरिश भारदे, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान फाळके म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार नीलेश लंके यांच्या विजयासाठी अॅड. ढाकणे यांनी जिवाचे रान केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील वववरं बदलले आहे. मिळालेले यश प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाचे फळ आहे. त्यामुळे ढाकणे याना पक्षाने आमदारकीसाठी उमेदवारी द्यावी असे म्हटले आहे.
ढाकणे म्हणाले कि, शेवगाव – पाथर्डी मतदार संघात आपण यात्रा काढणार असून जनतेचे प्रश्न जाणून घेणार आहे. विद्यमान आमदार यांचा नामोल्लेख टाळत… ते म्हणाले कि, त्यांचा प्रशासनावर वचाक राहिला नाही, त्यांची टक्केवारीची कार्यपद्धती सुरु आहे. कामे देखील निकृष्ठ दर्जाची झाली आहेत.
दरम्यान या निवडीपूर्वी कार्याध्यक्ष यांनी निवडी केल्या होत्या मात्र त्या रद्द करत हि नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामुळे काहीप्रमाणात नाराजीनाट्या देखील घडलेले पाहायला मिळाले.