jayant patil : राज्यपाल देखील विचार करत असतील: जयंत पाटील यांचा सरकारला मिश्किल टोला

0
jayant patil

jayant patil : राज्यपाल देखील विचार करत असतील: जयंत पाटील यांचा सरकारला मिश्किल टोला

jayant patil on budget 2024 : राज्यपालांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे केली. मात्र तो अधिकार त्यांना नाही. २४ डिसेंबर २०१६ रोजी शिवस्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन करून पायाभरणी करण्यात आली. आज या घटनेला ८ वर्ष पूर्ण होतील मात्र या कामास कोणतीही गती नाही. आज दि २९ जून रोजी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाला विरोध करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच शिवस्मारकाच्या काम त्वरित हाती घ्यावे, अभिभाषण वाचून राज्यपाल देखील विचार करत असतील अशी मार्मिक आणि मिश्किल टिपण्णी देखील पाटील यांनी केली.

एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवसंस्थेचे काय?
तसेच राज्याची २०२७-२८ पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे आपले लक्ष आहे. हे लक्ष महत्त्वकांक्षी असल्याचे स्वतःच राज्यपालांनी मान्य केले. महाराष्ट्राचा विकासदर १७ टक्क्यांवर गेला तरच ते शक्य आहे. आत्ता आपला विकासदर ७ टक्क्यांच्या आत आहे. २०२३ मध्ये दावोस मधून १. ३७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आणि त्यातून १ लाख रोजगार निर्माण होतील असे मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते. या घोषणेला आता दीड वर्ष होईल त्यामुळे किती जणांना नोकरी मिळाली त्यांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवावी. त्यामुळे काय ते स्पष्ट होईल असे जयंत पाटील यांनी म्हटले.

श्रीराम भाजपा नाही तर आमच्यासोबत…
या लोकसभा निवडणुकीची एका वाक्यात माहिती सांगायची झाली तर २०१९ साली नरेंद्र मोदींचे वाराणसीत लीड ४ लाख ७९ हजार होते ते घटून दीड लाखांवर आले आहे. संपूर्ण निवडणुकीचा मतितार्थ असा की, भाजपचा जनाधर घटला आहे. प्रभू श्रीराम आता भाजप सोबत नाही. श्रीराम आमच्या सोबत आहेत. इंडिया आघाडीला सर्वाधिक मतदान हे सच्चा हिंदूंच्या कडून झालेले आहे. म्हणून महाराष्ट्रात आम्ही ३१ जागांपर्यंत पोहोचलो.

गेली १० वर्ष जनतेला शिक्षा…
लोकांनी सत्ताधाऱ्यांना गेली दहा वर्ष जनतेला गृहीत धरण्याची शिक्षा दिली आहे. ही नोटबंदींची शिक्षा आहे, चुकीच्या पद्धतीने कोरोना हाताळणीची शिक्षा आहे, वाढलेल्या बेरोजगारीची शिक्षा आहे. याच निकालाची पुनरावृत्ती राज्यातील जनता विधानसभा निवडणुकीत करणार आहे, असे पाटील यांनी सभागृहात आपल्या भाषणावेळी म्हटले.

वाघनखे आणि तलवार यांचे काय?
सुधीरभाऊ मुनगंटीवार डिसेंबर २०२२ मध्ये म्हणाले होते की, आम्ही २०२३ च्या राज्यभिषेक सोहळ्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि तलवार भारतात आणू. आता २०२४ चा राज्याभिषेक सोहळाही होऊन गेला मात्र अजूनही शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार भारतात आलेली नाही. २०२३ च्या राज्यपाल अभिभाषणात देखील या बाबीचा उल्लेख होता आणि २०२४ च्या राज्यपाल अभिभाषणात देखील या बाबीचा उल्लेख आहे. राज्यपालांना किती अवघडल्यासारखे करणार? असा उपरोधिक टोला देखील पाटील यांनी सत्ताधार्यांना लगावला.

महायुती सरकारमध्ये राज्याने अनेक औद्योगिक प्रकल्प गमावले. रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या. महाराष्ट्र हा अधोगतीकडे वाटचाल करत आहे. शेतकरी, शेतमजूर यांना न्याय देणारे भाष्य नाही. यांचे लक्ष मोठे टेंडर काढायचे, रस्त्यांची घोषणा करायची पण ज्यांचे आयुष्य अडीच महिन्यांचे आहे त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवायचा कसा याचे भान जनतेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निव्वळ घोषणा करण्याचा अर्थ काय हे समजतेय असे पाटील यांनी म्हणतात सरकारच्या निष्क्रिय कारभाराचे वाभाडे काढले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.