IAS SUJATA SAUNIK : सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

IAS SUJATA SAUNIK : सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती
मुंबई – राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली करण्यात आली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. यापूर्वी सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलेले आहे. त्यांना हि संधी देऊन सरकारने एक चांगले पाउल उचलले आहे.
दरम्यान राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार (IAS SUJATA SAUNIK) सुजाता सौनिक यांनी सांभाळला आहे. त्यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. जून 2025 मध्ये त्या निवृत्त होतील.
सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिवपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे. दरम्यान मावळते मुख्यसचिव नितीन करीत यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपला असून त्यांच्या जागी सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली असून त्या पदभार स्वीकारणार आहेत.