POST OFFOCE JOB : पोस्टात नोकरीची संधी…पहा किती जागा, अटी-शर्ती

POST OFFOCE JOB : पोस्टात नोकरीची संधी…पहा किती जागा, अटी-शर्ती
POST OFFICE job : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिस (post office job) मध्ये भरती निघाली असून यासाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. केंद्र शासनाच्या या विभागात नोकरी करण्याची हि चांगली संधी आहे. सुमारे ३५ हजार पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
भारतीय डाक विभाग म्हणजेच पोस्टने ग्रामीण डाक सेवकाच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात अली असून भरती प्रक्रिया ही १५ जुलै २०२४ पासून सुरू होईल. त्यानंतर अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.
दरम्यान या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही. भरती प्रक्रियेसाठी पोस्टाच्या अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in या साईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. याच ठिकाणी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती उपलब्ध असणार आहे. अर्ज करण्यासाठी लिंक अद्याप सुरु झाली नसून ती १५ जुलैनंतर लिंक सुरु होईल त्यानंतरच अर्ज करता येणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात दिली गेली आहे. यासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे. तेच उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. संगणकाची माहिती असणे गरजेचे आहे, तसेच यासाठी १८ ते ४० वयाची अट असणार आहे. हि भरती सुमारे ३५ हजार जागांसाठी असणार आहे. यासाठी १०० रु. परीक्षा शुल्क असणार आहे. त्यानंतर रीतसर निवडप्रक्रिया पार पडून उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.