devendra fadanvis : राज्यात १ लोकांवर नोकऱ्या; फडणवीस यांची घोषणा

0
devendra fadanvis

devendra fadanvis : राज्यात १ लोकांवर नोकऱ्या; फडणवीस यांची घोषणा

Devendra Fadanvis on Government Jobs : राज्यात राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे 1 लाख 8 हजार नोकर भरती केली जाणार आहे. त्यामध्ये आतापर्यंत 57 हजार 452 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तर येत्या महिन्याभरात 19 हजार 853 अर्जदारांना नियुक्ती पत्र दिली जातील, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devedra fadanvis) यांनी विधान सभेत अधिवेशनावेळी केली आहे. याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हि माहिती दिली. त्यामुळे सरकारकडून बम्पर भरती महाराष्ट्रात केली जात असल्याचे म्हटले जात आहे. विधान सभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय घेतले जात आहेत, अशी टीका देखील विरोधकांकडून होत आहे.

दरम्यान राज्यात ऑगस्ट 2022 पासून पदभरती सुरु केली होती. राज्य सरकारकडून 75 हजार नवीन पद भरण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. आम्ही ही भरती सुरु केली. याबद्दल परीक्षा घेतल्या आणि अतिशय पारदर्शी पद्धतीने या परीक्षा पार पडल्या आहेत. अमरावतीत घडलेली घटना सोडली आणि तलाठी परीक्षेत पेपर चुकला, तो परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला, या व्यतिरिक्त अतिशय पारदर्शी पद्धतीने ही परीक्षा पूर्ण झाली. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात आमच्या शासनाने एक अतिशय चांगला रेकॉर्ड तयार केला आहे, असे देवेंद्र फडणवीस (devedra fadanvis) यांनी म्हटले आहे.

राज्यात ऑगस्ट 2022 नंतर 57 हजार 452 तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात अली आहेत. तर उर्वरित तरुणांना पुढील सव्वा महिन्यात किंवा महिन्याभरात नियुक्तीपत्र देण्यात येतील, त्यांची सुमारे 19 हजार 853 इतकी संख्या आहे. सरकारने सुमारे 75 हजार भरतीची घोषणा केली होती, याबद्दलची सर्व प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. याबद्दलचे नियुक्ती पत्रही देण्यात आले आहे. तर काहींना दिले जात आहेत. तसेच 31 हजार 201 पदांसाठीची प्रक्रिया येत्या 3 महिन्यात पूर्ण करु. म्हणजे जवळपास 1 लाख 8 हजार नोकऱ्या अडीच वर्षाच्या काळात सरकारने दिल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

थोडक्यात मुद्देशीर माहिती…
सरकारी नोकर भरती 1 लाखांवर !
आतापर्यंत 57,452 नियुक्ती आदेश दिले.
19,853 नियुक्ती आदेश लवकरच..!
77,305 एकूण नोकर भरती पूर्ण.
75,000 सरकारी नोकरभरती करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. ते पूर्ण केले आहे. याशिवाय आणखी 31,201 पदांसाठी कारवाई सुरू आहे.
त्यामुळे सरकारी नोकरभरती ही 1 लाखांच्या वर जाणार आहे.
एकही घोटाळा होऊ न देता ही प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे.
हा महाराष्ट्रातील नाही तर देशातील विक्रम आहे.
पेपरफुटीबाबत कठोर कायदा याच अधिवेशनात..

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.