PANKAJA MUNDE : भाजपाची विधान परिषदेची यादी जाहीर; मुंडे यांच्यासह ५ जणांना संधी…

PANKAJA MUNDE : भाजपाची विधान परिषदेची यादी जाहीर; मुंडे यांच्यासह ५ जणांना संधी…
VIDHAN PARISHAD – भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेसाठी राज्यातील ५ जणांच्या नावाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे (PANKAJA MUNDE) यांचे राजकीय पुनर्वसन करावे यासाठी कार्यकर्त्यांकडून दबाव आणला जात होता. त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर मराठा आणि ओबीसी असा सुप्त वाद बीडमध्ये अनुभवायला मिळाला. त्यांच्या पराभवानंतर काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली. तर पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन झाले नाही तर भाजपाला मतदान नाही असा देखील सूर समाजातून निघण्यास सुरुवात झाली होती. मात्र मुंडे यांनी कार्यकर्त्यांना असे करू नका, लवकरच वनवास संपेल असे म्हटले होते. तसेच ओबीसी भाजपापासून दुरावू नये याची देखील खबरदारी भाजपने घेतली असून भाजप नेत्या पंकजा मुंडे याना विधान परिषदेवर घेण्याचे बैठकीत ठरले आणि त्याच्यासह ५ जणांच्या नावांची घोषणा भाजपने केली आहे.
भाजपने विधान परिषदेसाठी 5 नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पंकजा मुंडे (pankaja munde) यांचे पहिले नाव आहे. यानंतर योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोखले यांची नावे आहेत. या यादीत पाचवे नाव हे महायुतीचे घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांचे आहे. भाजपकडे विधान परिषदेत ५ आमदार निवडून येतील इतके संख्याबळ आहे. महादेव जानकर यांची जागा सदाभाऊ खोत यांना देण्यात आली आहे. सदाभाऊ खोत एक शेतकरी चेहरा आहे. तसेच महायुतीला त्यांचा फायदा व्हावा, या विचारातून त्यांना विधान परिषदेवर संधी भाजपने दिली असावी.
दरम्यान भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे याना संधी देण्यात आलेली नाही. कदाचित त्यांना पक्ष संघटनेत किंवा भाजपच्या कोट्यातील ३ खासदारकीच्या जागा रिक्त झाली आहेत. त्याजागी त्यांची वर्णी लागू शकते.
मुंडे याना विरोध नाही – जरांगे पाटील
पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. त्यांना आमचा विरोध कधीच नव्हता. त्याच आम्हाला विरोधक मनात आहेत. आमच्या मानण्याने थोडेच भाजप निर्णय घेणार आहे. तो त्यांचा अपक्षांतर्गत विषय आहे. मुंडे यांच्या पाच पिढ्या राजकारणात होत्या. मराठ्यांनी त्यांना कधी विरोध केला नाही, अशी प्रतिक्रिया मराठा नेते आणि आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या निवडीनंतर दिली.
1 thought on “PANKAJA MUNDE : भाजपाची विधान परिषदेची यादी जाहीर; मुंडे यांच्यासह ५ जणांना संधी…”