panjab national bank : 2700 जागांसाठी भरतीप्रक्रियेस सुरुवात

panjab national bank : 2700 जागांसाठी भरतीप्रक्रियेस सुरुवात
Bank Job – बँकेमध्ये नोकरी शोधणारांसाठी गुड न्युज (good news) असून विविध पदांसाठी हि नोकरभरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज भरण्यासाठीही सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 30 जून 2024 पासून सुरू झाली आहे. एकूण 2700 पदांसाठी हि भरती होणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने (panjab national bank) हि जाहिरात काढली आहे. त्यामुळे उशीर न करता अर्ज करू शकता.
दरम्यान पंजाब नॅशनल बँकेकडून (panjab national bank) ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. pnbindia.in या साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जुलै 2024 आहे. या भरती प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून 2700 पदे भरली जाणार आहेत. यासाठी 20 ते 28 वयाची अट असणार आहेत. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीत सूट देण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी 28 जुलै 2024 रोजी परीक्षा घेतली जाईल, 100 गुणांची हि परीक्षा असून हि 100 प्रश्नांची असणार आहे. महिला आणि प्रवर्गातील उमेदवारांना 708 रूपये फीस असणार आहे. त्यामुळे शिकवू उमेदवारांना हि एक नामी संधी आहे. त्यामुळे उशीर न करता अर्ज करून परीक्षेची तयारी पात्र उमेदवारांनी करावी.