radhakrishna vikhe : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निकषासाठी मंत्रिमंडळ उंसमितीची बैठक

radhakrishna vikhe : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निकषासाठी मंत्रिमंडळ उंसमितीची बैठक
Mumbai – राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये दुष्काळ, अवकाळी पाऊस, चार छावणी आदींवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Ramakrishna vikhe) यांनी दिली आहे.
मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई देताना वापरण्यात येणाऱ्या एनडिव्हीआय च्या निकष लावण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe) यांच्यासह कृषी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती व्ही. राधा, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, यांच्यासह महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान या बैठकीत, दुष्काळ, सततचा पाऊस, अवकाळी पाऊस, इतर नैसर्गिक आपत्ती संदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत तसेच चारा छावणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी काही महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला, असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.