NARENDRA MODI : छत्रपती शिवाजी महाराज आराध्यदैवत, चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
VADHWAN PORT

NARENDRA MODI : छत्रपती शिवाजी महाराज आराध्यदैवत, चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi – “सिंधुदुर्गात जे झालं. ते माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत. आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचे भूमीपूजन तसेच विविध विकास कामांचे देखील उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, मोदी म्हणाले कि, “या पोर्टवर ७६ हजार कोटीहून अधिक जास्त रक्कम खर्च करणार आहोत. हे देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, संपूर्ण देशातील मी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचे काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाजा लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचे किती मोठे केंद्र होईल”.

बंदरामुळे रोजगार वाढेल : मुख्यमंत्री शिंदे
वाढवणं येथील सुमारे ७६ हजार २०० कोटी रुपयांच्या या बंदराच्या उभारणीद्वारे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार असून सुमारे साडे बारा लाख लोकांना रोजगार मिळणार आहेत. यासोबतच ७५७ कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या मत्स्यपालन पायाभूत सुविधा प्रकल्प आणि ३६४ कोटी रुपयांच्या बोटीवर ट्रान्सपॉंडर बसवण्याच्या योजनेचा राज्याला मोठा फायदा होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले.

यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर, केंद्रीय मत्स्यपालन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय मत्स्यपालन राज्यमंत्री प्रा.एस.पी.सिंह बघेल, केंद्रीय मत्स्यपालन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंदनद्रा फडणवीस, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे, सार्वजनिक बांधकाम तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ.हेमंत सावरा, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार निरंजन डावखरे तसेच पालघर जिल्ह्यातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.