21/02/2026
khaire-bhumre

खैरे - भुमरे यांच्यात "तू-तू, मै-मै"

chatrapati sambhajinagar – राज्यातील राजकारण गेल्या काही वर्षांपासून वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. या बदलत्या राजकारणाबद्दल अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आज दि ७ जून रोजी राजकीय परंपरेला तडा जाणारा प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला आहे. दोन्ही शिवसेना पक्षातील आजी माजी खासदारांमध्ये सर्वांसमोरच व्यासपीठावर तू-तू, मैं-मैं झाली. दमही दिला गेला, टिंगलही करण्यात आली. खासदार संदीपान भुमरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात हा प्रकार घडलेला पाहायला मिळाला.

दरम्यान दोन्ही नेते एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी एकत्र आले होते. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना नेते आणि माजी महापौर नंदकुमार घोडीले पक्षपात करत असल्याचा आरोप संदीपान भुमरे यांनी केला. त्यानंतर भर व्यासपीठावर संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात तू-तू, मैं-मैं सुरु झाली. प्रोटोकॉल का पाळत नाही? असा प्रश्न संदीपान भुमरे यांनी विचारला. तर चंद्रकांत खैरे यांनाही संदीपान भुमरे यांनी दम दिल्याचे म्हटले जातेय. त्यानंतर संदीपान भुमरे यांच्याकडून पुस्तक आडवे लावत चंद्रकांत खैरे यांची टिंगल करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय कुरघोडी आणि कलगीतुरा पाहायला मिळाला.

माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे शिवसेनेत एकत्र काम करत होते. मात्र शिवसेनेतील बंडानंतर खैरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत तर भुमरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा भुमरे यांनी पराभव केला होता. त्यानंतर मात्र हा वाद आणखीनच उफाळून आल्याचे दिसत आहे.

खासदार संदीपान भुमरे म्हणाले कि, खैरे हे माजी झाले आहेत, हे त्यांना समजत नाही. ते प्रोटोकॉल पळत नाहीत. तर येथे सार्वजनिक कार्यक्रम असल्याने प्रोटोकॉल काय पाळायचा असा प्रतिप्रश्न माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी करत भुमरे यांच्यावर टीका केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed