मुख्यमंत्री “योजना दूत” उपक्रम; १० हजार रुपये मानधन, आजच करा अर्ज !

मुख्यमंत्री "योजना दूत" उपक्रम; १० हजार रुपये मानधन, आजच करा अर्ज !
YOJANA DOOT –1 राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावी यासाठी सरकारकडून मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ५० हजार तरुण – तरुणींची योजना दूत (yojana doot) म्हणून निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी निवड झालेल्याना प्रतिमहिना 10000 रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शेवटचे सहा दिवस शिल्लक आहेत. सुमारे ६ महिने हे मानधन देण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होऊन प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये कमवण्याची तरुणांना उत्तम संधी आहे. त्यासाठी इच्छुकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर अर्ज करण्याची संधी दिली जाणार नाही. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे. तसेच उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असण तसेच त्याला संगणकाचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. या उपक्रमासाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे गरेजेचे आहे. त्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणेही आवश्यक आहे.
तसेच इच्छुक उमेदवाराला मुख्यमंत्री योजनादूत व्हायचे असेल तर त्याला विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा लागाणार आहे. त्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही, शिक्क्यासह), वैयक्तिक बँख खात्याचा तपशील, असणे गरजेचे आहे. उमेदवारांना योजनादूतच्या https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येनार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक तरुणांना साधी मिळणार आहे.