2030 पर्यंत ‘या’ आजारांमुळे वाढणार मृत्यूचा विळखा !

2030 पर्यंत 'या' आजारांमुळे वाढणार मृत्यूचा विळखा !
WHO – जागतिक आरोग्य संघटनेने मानवाच्या लाईफस्टाइलमुळे त्यांच्या आरोग्यावर विविध प्रकारे होणार परिणाम आणि नवीन संभावना याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 2030 पर्यंत लठ्ठपणा आणि हार्ट डिसीजची 50 कोटीहुन अधिक नवी प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असणार आहे. तसेच, 2030 पर्यंत क्रॉनिक लाइफस्टाइल डिसीजच्या प्रकरणात 70 टक्के वाढ होईल. नोकरदार वर्गामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहेत. यामुळे भविष्यात हृदयाशी संबंधित समस्या, स्ट्रोक, डायबिटीज, लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि कॅन्सरचा धोका कित्येक पटींनी वाढेल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने () व्यक्त केली आहे.
WHO च्या अहवालात पुढे सांगण्यात आले आहे की 2030 पर्यंत जगभरात होणाऱ्या बहुतांश मृत्यूंचे मुख्य कारण हे क्रॉनिक लाइफस्टाइल डिसीज असू शकते. वाईट जीवनशैलीमुळे अनियमित आहार, कमी झोप, तणाव, भूक न लागणे, शारीरिक हालचाल कमी होणे, खराब नातेसंबंध इत्यादी समस्या उद्भवतात. या सर्व कारणांमुळे क्रॉनिक डिसीज होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते. तसेच अनेक मेडिकल अहवालात असे आढळून आले आहे की डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका पुरुषांना अधिक असेल. तर महिलांमध्ये वाढत्या लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा धोका वाढेल. अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे अतिशय आवश्यक आहे. यामुळे आपण दीर्घकाळ तंदुरुस्त राहू शकतो.
क्रॉनिक लाइफस्टाइल डिसीज पासून काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी
१) रोज किमान 30 मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. चालणे, योग, किंवा सायकल चालवणे यासारखे व्यायाम शरीर तंदरुस्त ठेवतात.
२) आहारात ताजे फळं, भाज्या, संपूर्ण धान्यं, प्रोटीन यांचा समावेश करा. तेलकट, गोड पदार्थ कमी खा. कमी मीठ आणि साखर वापरा.
३) ध्यान, योग आणि श्वास घेण्याचे व्यायाम करून ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
४) दररोज 7-8 तासांची चांगली झोप घेणे महत्त्वाचे आहे. शरीराला विश्रांती मिळाल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
५) नियमित डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्या. रक्तदाब, साखर, आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर लक्ष ठेवा.
६) धूम्रपान आणि मद्यपान हे अनेक गंभीर आजारांना कारणीभूत असतात, म्हणून त्यापासून दूर राहणे चांगले.
७) डॉक्टरांनी काही औषधं दिली असतील तर ती वेळेवर आणि योग्य पद्धतीने घ्या.