उद्योजक अनंत ढोले यांना “नवराष्ट्र रत्न” पुरस्कार जाहीर !

उद्योजक अनंत ढोले यांना "नवराष्ट्र रत्न" पुरस्कार जाहीर !
पाथर्डी (प्रतिनिधी) – पाथर्डी येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष अनंत ढोले पाटील यांना नवभारत माध्यम समूह आणि दै. नवराष्ट्र यांच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा “नवराष्ट्र रत्न २०२४ पुरस्कार” जाहीर झाला असून पुरस्कार वितरण हे गुरुवार दि १९ सप्टेंबर २०२४ रोजी हॉटेल संजोग, अहमदनगर येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
दरम्यान अनंत ढोले यांचा उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास हा अत्यंत कठीण आणि खडतर राहिला आहे. खेडेगाव ते शहरापर्यंत आणि योद्योजक होण्यापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी कामे केली. त्यांना बँकिंग क्षेत्राचा चांगलाच अनुभव आहे. त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी मिळून चैतन्य अर्बन हि सहकारी पतसंस्था, विचारधन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ऋषी मेडीहॉल आदींच्या माध्यमातून आपले उद्योग उभे केले आहेत. तसेच त्यांचे या माध्यमातून सामाजिक कार्य देखील सुरु आहे.
“नवराष्ट्र रत्न २०२४ पुरस्कार” अनंत ढोले याना जाहीर झाल्यामुळे त्यांचे आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेस (sp) तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उद्योजक पप्पू बोर्डे आदींनी अभिनंदन केले आहे.
1 thought on “उद्योजक अनंत ढोले यांना “नवराष्ट्र रत्न” पुरस्कार जाहीर !”