sharad pawar : लाडकी बहीण योजना आणली, संरक्षणाचे काय?, सत्तेत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली : खा. शरद पवार

लाडकी बहीण योजना आणली, संरक्षणाचे काय?, सत्तेत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली : खा. शरद पवार
sharad pawar : राज्यांत सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी राज्य सरकारला सवाल केला. सरकार 1500 रुपये महिलांना देत आहात ठीक आहे. मात्र, माय माऊलींच्या अब्रूच्या रक्षणाचे काय असा सवाल खा. शरद पवारांनी केला.
मोदी सरकार शेतकरी विरोधी
मोदी सरकारने कांदा निर्यात बंद केली. देशात ऊस उत्पादन राज्यात होते, पण उसाला किंमत मिळत नाही. जे शेतकरी पिकवतात, जी किमत मिळाली पाहिजे ती मिळत नाही, हे मोदी सरकारचे काम आहे. मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार, कांदा, ऊस यांना योग्य दार नाही. आपण सत्तेत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती, मात्र मोदी सरकार हे निष्क्रिय सरकार आहे, अशी टिका शरद पवारांनी केली आहे.
दरम्यान पवार म्हणाले कि, सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. परंतु या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे. त्यांना आता खड्ड्यासारखे बाजूला काढा. या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे.
शिंदखेडा, धुळे येथील शेतकरी मेळाव्यात पवार शेतकर्या संबोधित करताना बोलत होते. पवार पुढे म्हणाले कि, अलीकडच्या काळात जे राज्यकर्ते आहेत त्यांना शेतीसंबंधी यंकिंचितही आस्था नाही. त्यांची अशी अनेक धोरणं सांगता येतील जी धोरणं शेतकरी हिताची नाहीत.आजच्या भाषणांमध्ये कांद्याचा उल्लेख झाला कांदा एका दृष्टीने जिरायत शेतकऱ्याचे पीक, सामान्य माणसाचं खाद्य. तुम्ही पिकवलेला कांदा मग तो धुळे जिल्ह्यातला असेल, नाशिकचा असेल, पुणे जिल्ह्यातला असेल, सातारा जिल्ह्यातला असेल त्या कांदा उत्पादकाला अधिकचे दोन पैसे मिळायला पाहिजेत ही तुमची मागणी रास्त आहे. तो काय मोठा बागायतदार नाही. कांदा पिकवतो, त्या कांद्याला जगाची बाजारपेठ द्यायची असेल तर कांदा निर्यात केला पाहिजे आणि मोदींचे सरकार आलं आणि कांद्याच्या निर्यातीला बंदी घातली म्हणजे ज्यांनी कष्टाने कांद्याचे पीक घेतलं, दोन पैसे मिळतील म्हणून जगात पाठवायचा निकाल घेतला तर त्याच्यावर बंदी. आपल्या राज्यात काही भागांमध्ये उसाचे पीक घेतलं जातं. आज हिंदुस्थानामध्ये दोन नंबरचा उसाचं उत्पादन तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतं. उसापासूनपासून साखरनिर्मिती होते, मळीपासून इथेनॉल होतं आणि अन्य पदार्थापासून वीज तयार करता येते आणि मग शेतकऱ्याला उसाची किंमत ज्यादा देता येते. मोदी सरकार आलं आणि ज्या शेतकऱ्यांनी उसातून विविध पूरक उत्पादनं घ्यायचं ठरवलं त्यावर बंधन घातली. त्यावर मर्यादा घातल्या. गहू-तांदूळ हे महाराष्ट्रात, देशात महत्त्वाचं पीक. मोदी सरकारने त्याच्यावरही बंधनं घातली. जे काही तुम्ही पिकवता आणि तुम्हाला घामाची किंमत ज्या उत्पादनावर मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही हे सूत्र आजच्या मोदींच्या सरकारने स्वीकारलं आहे. म्हणून आम्ही सांगतो हे मोदी सरकार बळीराजाविरोधी आहे, शेतकरीविरोधी आहे.
उजनी धरणावरून चव्हाणांची आठवण1
उजनीचं धरण बांधत असताना चव्हाण साहेबांनी एक गोष्ट सांगितलेली कायम लक्षात राहिली, धरण उभारणीच्या भाषणात चव्हाण साहेब म्हणाले होते की पांडुरंगा मी तुझी चंद्रभागा डवतोय कारण तुझ्या दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्याच्या शिवारात पाणी यावं आणि त्याची ज्वारी पिकावी आणि त्या ज्वारीच्या कंसाच्या दाण्यांमध्ये माझ्या शेतकऱ्याला पांडुरंगा तुझा दर्शन व्हावं म्हणून. जे वारकरी मंडळी संतांचा विचार सांगतात, त्या संतांना आणि त्या संतांचा विचार सांगणाऱ्यांचा सन्मान करण्याचं मोठं काम हे आमचे सहकारी संदीप बेडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले त्याबद्दल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. या भजनी मंडळाच्या मार्फत शांततेचा, संयमाचा, समंजसपणाचा संदेश तुम्ही गावामध्ये आपल्या संगीताच्या टाळ मृदुंगाच्या आवाजातून निर्माण कराल, लोकांना प्रोत्साहन द्याल आणि त्यातून महाराष्ट्रात सद्भावनेचं एक वेगळं चित्र उभा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे देखील पवार यांनी यावेळी म्हटले.
यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, प्रदेश सरचिटणीस संजय बेडसे, धुळे जिल्हा निरीक्षक उमेश पाटील, जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मराठे, शहर अध्यक्ष रणजित भोसले, एन.सी.पाटील, कामराज निकम, जुई देशमुख, डॉ. मनोज महाजन, मध्यप्रदेशचे आमदार श्री. सोळंकी, माजी आमदार दिलीप सोनावणे, बी एन पाटील, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, कल्पनाताई महाले, उषाताई पाटील, डॉक्टर कैलास ठाकरे आदी उपस्थित होते.