… तेव्हा केजरीवालांनी ऐकले नाही : आण्णा हजारे

... तेव्हा केजरीवालांनी ऐकले नाही : आण्णा हजारे
anna hajare on kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण दोन दिवसांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. यावर आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (anna ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे म्हणाले, ‘मी अरविंद केजरीवाल यांना राजकारणात येऊ नका, असे आधीच सांगत होतो. समाजाची सेवा करा. तुम्ही खूप मोठा माणूस व्हाल मात्र त्यांनी ऐकले नाही.
तसेच अण्णा हजारे म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो. त्यावेळी मी राजकारणात येऊ नका असे वारंवार सांगितले. समाजसेवेमुळे आनंद मिळतो. आनंद वाढवायचा पण त्याच्या मनात काही पटले नसावे. आज जे व्हायला हवे होते ते झाले. त्याच्या हृदयात काय आहे, मनात काय आहे याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, याबाबत आपण काही सांगू शकत नाही.