Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली ; शिष्टमंडळाची शिंदे यांच्यासोबत बैठक !

1
dhangar arakshan - Cm Eknath Shinde

धनगर आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली ; शिष्टमंडळाची शिंदे यांच्यासोबत बैठक !

dhangar reservation : राज्यातील धनगर समजाला एसटीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलकांकडून पंढरपूर येथे सातत्याने उपोषण सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दि. १५ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते.

तसेच धनगर समाजाला सध्या एनटी संवर्गातून आरक्षण मिळत आहे. पण देशभरात धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळत आहे. राज्यात देखील एसटीमधून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने करत आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देऊ असे म्हटले जाते तसेच धनगर बांधवांबाबत होत होते. मात्र आता सरकारकडून धनगर आरक्षणासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

दरम्यान पंढरपुरात उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांच्या भेटीसाठी मी आणि मंत्री चंद्रकांत पाटील गेलो होतो. आज सुट्टीचा दिवस असतानाही सर्व सिनियर अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली”, अशी माहिती बैठकीनंतर शंभूराज देसाई यांनी दिली.

धनगर आणि धनखड हे एकच ?
तसेच“सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मागणी होती की, धनगर आणि धनखड हे एकच आहेत, अशा पद्धतीचा स्वतंत्र जीआर सरकारने काढावा. तो जीआर कशापद्धतीचा असावा, यासाठी तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची, तसेच त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आले होते, त्यापैकी पाच प्रतिनिधी यांची समिती स्थापन करुन त्यांनी हा जीआरचा मसुदा कसा असावा, जीआर काढला तर तो कोर्टात टीकला पाहिजे, या बाबतीत ती समिती लगेचच चार दिवसात बसेल आणि जीआरचा ड्राफ्ट तयार करतील. अॅडव्होकेट जनरल साहेबांचे त्यावर मत घेतले जाणार आहे.आणि पुढची कार्यवाही सकारात्मक करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला”, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

पंढरपूर येथील धनगर बांधवानी उपोषण मागे घ्यावे असे सांगण्यात आले आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धनगर आरक्षणासाठी सकारात्मक आहेत, अनेक मागण्या मान्य देखील करण्यात आल्या असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.

About The Author

1 thought on “Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली ; शिष्टमंडळाची शिंदे यांच्यासोबत बैठक !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.