maharashtra rain : शेतकऱ्यांसाठी हाय अलर्ट! राज्यात मुसळधार पावसाची शक्यता : पंजाबराव डंख

maharashtra rain : शेतकऱ्यांसाठी हाय अलर्ट! राज्यात मुसळधार पावसाची शक्यता : पंजाबराव डंख
maharashtra rain : राज्यात सध्या पावसाने लपंडाव लावला आहे. कुठे जोराचा तर काही ठिकाणी हलकासा तर काही ठिकाणी काहीच पाऊस पडताना दिसत नाही. त्यातच हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाचा (rain) अंदाज व्यक्त केला आहे. पुढचे पाच ते सहा दिवस हवामान कोरडे राहणार आहे. 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान राहील. या काळात पावसाने विश्रांती पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र मुसळधार पाऊस कोसळणार आहे. पंजाबराव डख यांनी तसा अंदाज व्यक्त केला आहे.
Read Thins : Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली ; शिष्टमंडळाची शिंदे यांच्यासोबत बैठक !
दरम्यान 21 तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडायला सुरुवात होईल असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहावे, असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे. तसेच शेतीची राहिलेली कामे देखील शेतकऱ्यांनी करून घ्यावीत. तसेच काढणीला आलेली पीक काढून घ्यावीत.
दरम्यान सप्टेंबर आणि आक्टोबर महिन्यात चांगलंच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. मात्र 5 नोव्हेंबरपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असल्याचा अंदाज देखील डख यांनी व्यक्त केला आहे.
1 thought on “maharashtra rain : शेतकऱ्यांसाठी हाय अलर्ट! राज्यात मुसळधार पावसाची शक्यता : पंजाबराव डंख”