Sharad Pawar : राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Sharad Pawar : राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Sharad pawar letter to cm : राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खा. शरद पवार (sharad pawar) यांनी केली आहे. या भेटीतून विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत.


दरम्यान राज्यसेवा परीक्षा आणि ibps परीक्षा हि एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीवरून परीक्षा पुढे ढकलल्या मात्र पुढे याबाबत निर्णय घेतला गेला नाही. तसेच कृषी पदांच्या बाबत देखील आयोगाने कोणताच निर्णय घेतला नाही. संयुक्त पूर्व परीक्षा या एप्रिल किंवा मे महिन्यात आयोजित केल्या जातात मात्र याबाबत कोणतीच प्रक्रिया केली गेली नाही. अपेक्षित जागा वाढ करून आचार संहिता लागण्यापूर्वी पुढील प्रक्रिया करावी, या मागण्या पूर्ण कराव्यात असेही पवार यांनी म्हटले आहे.
तसेच राज्य सेवा, कृषी सेवा, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर सहाय्यक आदी परीक्षांच्या निकाल जाहीर झाला मात्र पात्र पदांवरील उमेदवारांना अद्याप देखील नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत. त्या त्वरित द्याव्यात.न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या विविध विभागातील जागांच्या प्रक्रिया मार्गी लावावी. राज्यातील शिक्षक आणि प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात अशा विविध मागण्यांचे पात्र खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना लिहिले आहे. तसेच भेटीची वेळ मागितली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी पवार याना साकडे घातले होते. यामुळे पवार यांनी हे पात्र लिहिले आहे.