महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घेणार उद्योजकांची बैठक

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घेणार उद्योजकांची बैठक
ज्ञानेश्वर सृष्टी आराखड्यास अंतिम स्वरूप, अहोल्यादेवी स्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी…
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या औद्यगिक विकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या आरखड्याला पाठबळ मिळावे तसेच जिल्ह्यात अधिकची गुंतवणूक येण्यासाठी आॅक्टोबरच्या पहील्या आठवड्यात नामवंत उद्योजकांच्या उपस्थितीत गुंतवणूक परीषद आयोजित करण्यात आली असल्याची माहीती महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य सरकारच्या विविध योजनाचा आढावा घेतला.दूरदृष्य प्रणालीने त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी तहसिलदार आणि अन्य क्षेत्रिय अधिकरायांशी संवाद साधून योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी जाणून घेतल्या. बैठकी नंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की जिल्ह्यात शिर्डी नगर आणि बेलंवडी येथे औद्योगिक वसाहती करीता जागा उपलब्ध करून दिली आहे.उद्योजकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने आता जिल्ह्यात गुंवणूक यावी आशी अपेक्षा वाढली आहे.त्यादृष्टीने उद्योग परीषदेचे आयोजन करण्यात येणार असून देशातील नामवंत उद्योजक उपस्थित राहावेत असे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हयाच्या दृष्टीने महत्वकांक्षी ठरणार्या नेवासे येथील संत ज्ञानेश्वर सृष्टीच्या आराखड्यास आता अंतिम स्वरुप देण्यात आले असून,संत ज्ञानेश्वरांचा संपूर्ण जीवन प्रवास या सृष्टीच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून तयार झालेल्या आराखड्याचे सादरीकरण लवकरच मुख्यमंत्र्या समोर करण्यात येणार आहे.ज्ञानेश्वर सृष्टी करीता आठशे कोटी रुपयांचा निधी लागेल यामध्ये प्रवरा नदी पात्राच्या घाटाच्या विस्ताराचा समावेश असेल.
वारकरी सांप्रदया भाविक यांच्यासह जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक आशा प्रकल्पात वारकरी सांप्रदयाचे योगदान लागणार आहे.यासाठी सर्व किर्तनकार प्रवचनकार आणि वारकरी सांप्रदयांच्या प्रतिनीधीची बैठक अहील्यानगर येथे घेणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहील्यादेवी यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल कृषी विभागाची जागा मिळावी यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.जिल्ह्यातील श्रीरामपूर संगमनेर जामखेड पारनेर आदी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभराण्याचा निर्णय घेतला होता.स्मारकाच्या जागा उपलब्धतेचा प्रश्न स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मार्गी लागत असल्याचे विखे पाटील यानी सांगितले.
११लाख ३६ हजार महीलांची नोंद
राज्य सरकारच्या सर्व योजनांच्या अमंलबजावणी मध्ये अहील्यानगर जिल्ह्याने मोठी आघाडी घेतल्याबद्दल जिल्हधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभाग प्रमुखांचे त्यांनी अभिनंदन केले असून,आतापर्यत ११लाख ३६ हजार महीलांची नोंद मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी झाली यापैकी १०लाख महीलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
1 thought on “महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घेणार उद्योजकांची बैठक”